विषय- Free रेजिस्ट्रेशन
प्रश्न - स्थळांची ची माहिती आपण फ्री मध्ये बघू शकतो का ?
उत्तर -आपण रेजिस्ट्रेशन केल्यावर स्थळांची ची माहिती / फोटो फ्री मध्ये बघू शकतात . फक्त त्यांचे संपर्क नंबर दिसत नाही. कॉन्टॅक्ट नंबर्स बघण्यासाठी वर स्थळांना मेम्बरशिप घ्यावी लागते .वधू स्थळांसाठी मात्र मेम्बरशिप फ्री आहे .
प्रश्न - फ्री रेजिस्ट्रेशन केल्यावर सुद्धा माझे प्रोफाइल Disable का दिसत आहे ?
उत्तर - फ्री रेजिस्ट्रेशन करतांना आपल्याला - आपले योग्य नाव , फोटो , वय टाकणे गरजेचे आहे . जर ह्यापैकी काही चुकीचे आढळ्यास आपले प्रोफाइल disable करण्यात येते .
प्रश्न - प्रोफाइल मधील प्रोफाइल फोटो कसा बदल करायचा ?
उत्तर - आपल्या user पॅनल मध्ये "Edit Profile " असे बटण आहे - त्याला क्लिक केले कि आपल्याला एडिट फॉर्म चे page येईल . तेथून आपण आपला प्रोफाइल फोटो change करू शकतात
प्रश्न - मी प्रोफाइल फोटो उपलोड केला होता , परंतु तो डिलीट करून प्रोफाइल का डिसेबल करण्यात आले ?
उत्तर - आपल्या प्रोफाइल ला योग्य फोटो असणे अतिशय आवश्यक आहे. प्रोफाइल फोटो अयोग्य असेल तर प्रोफाइल सिस्टिम द्वारे डिसेबल करण्यात येते. आपण आपल्या यूजर पॅनल मधून आपला नवीन प्रोफाइल फोटो अपलोड करू शकतात . आपण आपला प्रोफाइल फोटो खालील प्रमाणे असेल अशी काळजी घेणे गरजेचे आहे 1) स्वतःचा अलीकडील ( लेटेस्ट ) फोटो वापरा. २) फोटोमध्ये तुम्ही एकमेव व्यक्ती असाव्यात. 3) तुमचा चेहरा फोकसमध्ये असावा. ४) फोटो म्हणून इतर कोणतीही प्रतिमा वापरू नका.
प्रश्न - प्रोफाइल चा नोंदणीकृत मोबाईल नंबर हा व्हाट्सअँप चा असणे गरजेचे आहे का ?
उत्तर - रेजिस्ट्रेशन करतांना ( पूर्व सूचना दिल्याप्रमाणे) आपण व्हाट्सअँप नंबर नेच रेजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. आपल्या प्रोफाइल ला जर व्हाट्सअँप नंबर नसेल तर इतर प्रोफाइल आपल्याशी व्हाट्सअँप चॅट करू शकणार नाहीत . तरी आपल्याला विनंती करण्यात येते कि आपण जर रेजिस्ट्रेशन करतेवेळी व्हाट्सअँप नंबर ने रजिस्ट्रेशन केले नसेल तर आपल्या सपोर्ट चॅट वर संपर्क करून आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर चेंज करून घ्या.
विषय - फोटो ID वेरिफिकेशन
प्रश्न - फोटो आयडी वेरिफिकेशन साठी काय अपलोड करावे लागेल ?
उत्तर - फोटो आयडी - वेरिफिकेशन साठी आपण खालील पैकी कुठलेही एक अपलोड करू शकतात - आधार कार्ड , ड्रायविंग लायसन्स , पॅनकार्ड , वोटर कार्ड , पासपोर्ट. इत्यादी ..फोटो ID मध्ये आपला फोटो, नाव आणि जन्म तारीख असणे गरजेचे आहे .
प्रश्न - फोटो ID वेरिफिकेशन का करायचे ?
उत्तर - कृपया नोंद घ्या कि ज्या प्रोफाईल्स चे फोटो ID वेरिफिकेशन झ्हालेले असते , ते प्रोफाईल्स अँप च्या सॉफ्टवेअर च्या नुसार डिस्प्ले मध्ये जास्त वेळा दाखवले जाते .ज्या प्रोफाईल्स चे फोटो ID वेरिफिकेशन झ्हालेले नाहीये ते अँप च्या सॉफ्टवेअर च्या नुसार डिस्प्ले मध्ये कमी वेळा दाखवले जातात. त्यामुळे फोटो ID वेरिफिकेशन झ्हालेल्या प्रोफाईल्स ना संपर्क होण्याची शक्यता कधीही जास्त असते . त्यामुळे आपल्या प्रोफाइल चे फोटो ID वेरिफिकेशन करून घेणे गरजेचे आहे .
प्रश्न - फोटो ID अपलोड कसे करायचे ?
उत्तर - सोपे आहे , आपल्या अँप च्या युजर पॅनल मधून आपण फोटो ID अपलोड करू शकतात .
प्रश्न - फोटो ID वेरिफिकेशन मध्ये काय बघितले जाते ( मॅच केले जाते ) ?
उत्तर - फोटो ID वेरिफिकेशन मध्ये आपल्या प्रोफाइल चे नाव , फोटो , व जन्म तारीख ( वय ) हे आपल्या फोटो ID शी बघितले जाते ( मॅच केले जाते ) .
विषय - मेम्बरशिप..
प्रश्न - मेम्बरशिप चा प्लॅन काय आहे ?
उत्तर - मेम्बरशिप च्या प्लॅन च्या अधिक माहिती साठी , आपल्या User पॅनल मधील " मेम्बरशिप " ह्या बटण ला क्लिक करा .
प्रश्न - स्थळांचे चे फोन नंबर योग्य असतात का ?
उत्तर - प्रत्येक स्थळाचे चे रेजिस्ट्रेशन हे मोबाइल वर SMS च्या OTP वेरिफिकेशन द्वारे केले जाते . त्यामुळे प्रत्येक स्थळाचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर हा योग्यच असतो .
प्रश्न - मेम्बरशिप घेतल्यावर इतर स्थळांना व्हाट्सअँप द्वारे संपर्क करू शकतो का ?
उत्तर - मेम्बरशिप घेतल्यावर तुम्ही इतर प्रोफाईल्स ना संपर्क करू शकतात . ज्या प्रोफाईल्स च्या फोटो खाली व्हाट्सअँप चा लोगो आहे , त्यांना व्हाट्सअँप करू शकतात . आणि ज्या प्रोफाईल्स च्या फोटो खाली कॉल चा लोगो आहे त्यांना कॉल करू शकतात ( त्या प्रोफाईल्स चे व्हाट्सअँप नाहीये )
प्रश्न - मेम्बरशिप चे पेमेन्ट कसे करायचे ?
उत्तर - मेम्बरशिप चे payment अँप मधील मेम्बरशिप च्या बटण द्वारेच केले जाते .ह्या व्यतिरिक्त अँप मधील QR कोड द्वारे - Pay tm / गूगल पे वैगरे करू शकतात . कॅश / चेक स्वीकारले जात नाही . कॉन्टॅक्ट नंबर्स बघण्यासाठी वर स्थळांना मेम्बरशिप घ्यावी लागते .वधू स्थळांसाठी मात्र मेम्बरशिप फ्री आहे .
प्रश्न - मेम्बरशिप च्या प्लॅन च्या पेमेन्ट व्यतिरिक्त सुद्धा काही पेमेन्ट करावे लागते का ?
उत्तर - कृपया नोंद घ्या कि मेम्बरशिप च्या प्लॅन च्या payment व्यतिरिक्त लग्न जमल्यावर किंवा कश्याहीसाठी पैसे घेतले जात नाही.
प्रश्न - मला तुमच्याकडून पेमेन्ट संदर्भात फोन येणार का ?
उत्तर - कृपया नोंद घ्या आमच्याकडून payment साठी किंवा इतर कशाहीसाठी फोन केला जात नाही .
प्रश्न - आपली मेम्बरशिप ची फी योग्य आहे का ?
उत्तर - टेकनॉलॉजि चा उपयोग समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल हेच आमचे ध्येय असल्याने , आम्ही नेहमी मेम्बरशिप फी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करतो , परंतु काही बेसिक Fixed कॉस्ट असतात जसे सर्व्हर , होस्टिंग , बॅकेन्ड , इत्यादी . त्यामुळे किमान समाज दर हा ठेवावा लागतो . परंतु आपली फी हि इतर मॅट्रिमोनी साईट्स च्या तुलनेत खूपच कमी आहे व नेहमी कमीच असेल. कॉन्टॅक्ट नंबर्स बघण्यासाठी वर स्थळांना मेम्बरशिप घ्यावी लागते .वधू स्थळांसाठी मात्र मेम्बरशिप फ्री आहे .
प्रश्न - मेम्बरशिप चे पेंमेंट करण्यासाठी काय काय ऑपशन्स आहेत ?
उत्तर - मेम्बरशिप चे payment अँप मधील मेम्बरशिप च्या बटण द्वारेच फक्त ऑनलाईन पद्धतीनेच केले जाते . ह्यामध्ये आपण नेटबँकिंग , UPI , Paytm / फोन पे / Wallet इत्यादी , तसेच क्रेडिट / डेबिट कार्ड च्या द्वारे सुद्धा करू शकतात
प्रश्न - मी मेम्बरशिप चे पेमेन्ट केले आहे पण माझी मेम्बरशिप चालू झ्हाली नाहीये ?
उत्तर - पेमेंट झ्हाल्यावर मेम्बरशिप लगेच ऑटोमॅटिक चालू होते . परंतु क्वचितच कधी सर्वर ईशु मुळे मेम्बरशिप लिंक होत नाही .काळजी करू नका , जर आपली मेम्बरशिप २४ तासात चालू नाही झ्हाली तर , पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट आपल्या सपोर्ट ला पाठवा . आम्ही लगेच आपले मेम्बरशिप चालू करू.
प्रश्न - मेम्बरशिप चे पेमेंट रिफंड होते का ?
उत्तर - नाही - ऑनलाईन मॅट्रिमोनी मधील मेम्बरशिप चे पेमेंट हे " सर्विसेस " च्या अंतर्गत येत असल्याने - हे पेमेंट रिफंड होत नाही .
प्रश्न - माझे पेमेंट सारखे फेल होत आहे ? काय issue असू शकतो ?
उत्तर - ऑनलाईन पेमेंट हे अतिशय सोपे आहे . पेमेंट हे तुमची बँक आणि पेमेंट गेटवे ( रेझर पे ) ह्यांच्या लिंकिंग वर अवलंबून असते . जर ऑनलाईन पेमेंट वारंवार fail होत असल्यास तुम्ही अँप मध्ये दिलेल्या QR कोड द्वारे Paytm / Google पें इत्यादी द्वारे सुद्धा करू शकतात .
विषय - प्रोफाइल संपर्क ( चॅट )....
प्रश्न - स्थळांशी संपर्क करण्यासाठी काय करावे लागेल ?
उत्तर - कॉन्टॅक्ट नंबर्स बघण्यासाठी वर स्थळांना मेम्बरशिप घ्यावी लागते .वधू स्थळांसाठी मात्र मेम्बरशिप फ्री आहे . मेम्बरशिप घेतल्यानंतर आपण इतर स्थळांना कॉन्टॅक्ट करू शकता .आपल्याला ज्या स्थळाला संपर्क करायचा असेल त्या स्थळाच्या फोटो खाली असलेल्या व्हाट्सअँप लोगो ला क्लिक करून आपण स्थळाला व्हाट्सअँप करू शकतात . ज्यांचे व्हाट्सअँप नाही तिथे कॉल चा लोगो असतो त्यांना कॉल करू शकतात .
प्रश्न - काही स्थळांना ना संपर्क केला असता त्यांनी योग्य असा रिस्पॉन्स दिला नाही ?
उत्तर - कृपया नोंद घ्या कि प्रत्येक प्रोफाइल चे रजिस्ट्रेशन करतांना , त्यांच्या मोबाईल नंबर चे OTP द्वारे वेरिफिकेशन केले जाते . त्यामुळे प्रत्येक रजिस्टर्ड मोबाइल हा योग्यच असतो .कृपया नोंद घ्या कि स्थळांनी काय उत्तर द्यावे हे सर्वस्वी त्या प्रोफाइल वर अवलंबून आहे . काही वेळेला नको असलेल्या प्रोफाइल ला टाळण्यासाठी सुद्धा लग्न जमले असे सांगितले जाऊ शकते . ज्या स्थळांचे लग्न जमले / झ्हाले असेल किंवा अजून काही कारणास्तव प्रोफाइल delete करायची असल्यास अँप मधील "Delete प्रोफाइल " ह्या बटण द्वारे स्वतःची प्रोफाइल लगेच delete करू शकतात. कृपया नोंद घ्या कि आम्ही प्रोफाइल delete करू शकत नाही . परंतु तरीही काही अशी स्थळे अँप मध्ये असल्यास ती त्या स्थळांची चीच जबाबदारी आहे . पेड मेंबर्स ने कृपया ह्याची नोंद घ्यावी .
प्रश्न - दोन्ही स्थळांमधील होणाऱ्या चॅट / संपर्काची ची जबाबदारी कुणाची ?
उत्तर - कृपया नोंद घ्या कि प्रत्येक प्रोफाइल चे रजिस्ट्रेशन करतांना , त्यांच्या मोबाईल नंबर चे OTP द्वारे वेरिफिकेशन केले जाते . त्यामुळे प्रत्येक रजिस्टर्ड मोबाइल हा योग्यच असतो . प्रोफाईल्स ने Whatsapp चॅट / कॉल करणे किंवा आलेले Whatsapp चॅट / कॉल घेणे हि सर्वस्वी स्थळांचीच जबाबदारी आहे . समोरच्या स्थळाशी काय चॅट / कॉल करायचे , काय आणि किती माहिती द्यायची हि सर्वस्वी फक्त प्रत्येक स्थळाची ची जबाबदारी असते. कृपया नोंद घ्या कि ह्या मध्ये संस्थे ची काही जबाबदारी नाही . प्रत्येक प्रोफाइल ने आपापल्या जबाबदारीवर संभाषण करावे
प्रश्न - काही प्रोफाईल्स चे WhatsApp ला उत्तर नाही ? किंवा काही प्रोफाइल्स चे फोन बंद आहेत ?
उत्तर - कृपया नोंद घ्या कि प्रत्येक प्रोफाइल चे रजिस्ट्रेशन करतांना , त्यांच्या मोबाईल नंबर चे OTP द्वारे वेरिफिकेशन केले जाते . त्यामुळे प्रत्येक रजिस्टर्ड मोबाइल हा योग्यच असतो . कुठल्या प्रोफाइल ने कुणाला काय उत्तर द्यावे किंवा नाही हे सर्वस्वी प्रत्येक प्रोफाइल चा अधिकार आहे . प्रोफाइल चे व्हाट्सअँप ला उत्तर किंवा फोन बंद असणे हे सर्वस्वी त्या प्रोफाइल वरच अवलंबून आहे . ह्याची कुठली मॅट्रिमोनी site जबाबदारी घेऊ शकत नाही .
प्रश्न - अँप मध्ये नवीन स्थळें कधी अपलोड केले जातात ?
उत्तर - कृपया नोंद घ्या कि अँप मध्ये स्थळे ऍडमिन कडून अपलोड केली जात नाही .अँप मध्ये स्थळांचे रजिस्ट्रेशन हे फक्त स्वतः स्थळां मार्फतच केले जाते . जर आपल्याला योग्य असे स्थळे अँप मध्ये दिसत नसल्यास थोडी वाट बघा . नवीन स्थळे जसे रजिस्टर होतात ,तसे ते अँप मध्ये दिसतात . आपल्याला जी स्थळे पसंत पडतात ती शॉर्टलिस्ट करून ठेवा .
विषय - प्रोफाइल ची सुरक्षा....
प्रश्न - मला इतर प्रोफाइल डायरेक्ट कॉन्टॅक्ट / कॉल करणार नाही ह्याचे कंट्रोल कसे करू शकते ?
उत्तर - सर्व ऑनलाईन मॅट्रिमोनी साईट्स वर आपल्याला योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते . जर आपल्याला समोरील प्रोफाइल चा डायरेक्ट कॉल घ्यायचा नसेल तर आपल्या प्रोफाइल ला फक्त Whatsapp चॅट चे ऑपशन चालू ठेवा , व ह्या नंबर चे नॉर्मल मोबाईल कॉल चे ऑपशन बंद करा . म्हणजे आपल्याला फक्त व्हाट्सअँप चॅट येतील व समोरील प्रोफाइल चा योग्य अभ्यास करून आपण पुढील संभाषणाची दिशा ठरवू शकतात . अशारितीने आपण प्रोफाइल चॅट मध्ये आपली संपूर्ण सुरक्षा पाळू शकतात
विषय - Technical सपोर्ट / इतर माहिती......
प्रश्न - मला स्थळांसंबंधी काही माहिती विचारायची होती ?
उत्तर - कृपया नोंद घ्या कि आम्ही फक्त अँप संबंधी तांत्रिक सेवा प्रदान करतो . स्थळांसंबंधी ची माहिती तुम्ही स्वतः अँप मध्ये बघू शकता .
प्रश्न - तुम्ही आमची विवाह संदर्भात काही मदत करू शकतात का ?
उत्तर - कृपया नोंद घ्या कि आम्ही फक्त अँप संबंधी तांत्रिक सेवा प्रदान करतो .आम्ही वैयक्तिक सेवा प्रदान करत नाही .
प्रश्न - मला अँप वापरतांना तांत्रिक अडचण का येत आहे ?
उत्तर - अँप मध्ये काही तांत्रिक अडचण येत असल्यास सर्वात महत्वाचे २ कारणे आहेत १) आपल्या मोबाइल चे इंटरनेट योग्य आहे का त्याची खात्री करा . २) जर आपण वापरत असलेल्या अँप चे व्हर्जन जुने असेल तर अँप मधील काही फिचर वापरतांना अडचण येऊ शकते. अँप अपडेट करण्याचे बटण User पॅनल मध्ये दिलेले आहे, किंवा आपण प्लेस्टोर ला जाऊन सुद्धा अँप अपडेट करू शकतात .
प्रश्न - मला काही मदत हवी असल्यास कुठे संपर्क करायचा ?
उत्तर - आपल्याला काही सपोर्ट हवा असल्यास आपल्या सपोर्ट ई-मेल - द्वारे आमच्याशी संपर्क करू शकतात . संपर्क करतांना आपला USER ID , आपली अँप चे स्क्रीनशॉट , तसेच आपले प्रश्न सविस्तर सांगा . म्हणजे आमचे ग्राहक प्रतिनिधी आपल्या शंकेचे योग्य निरसन करू शकतील .
प्रश्न - आपला डायरेक्ट कॉल चा नंबर नाही का ?
उत्तर - १) आपल्याला काही सपोर्ट हवा असल्यास आपल्या सपोर्ट चॅट - द्वारे आमच्याशी चॅट करू शकतात . २) कृपया नोंद घ्या कि चॅट द्वारे संभाषण चे रेकॉर्ड राहते आणि प्रत्येक वेळी मागील संभाषणाच्या आधारे , पुढच्यावेळेस आमचा इतर प्रतिनिधी सुद्धा आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू शकतो. ३) डायरेक्ट कॉल पेक्षा सपोर्ट चॅट द्वारे आम्ही एकाच वेळेला अनेक प्रोफाईल्स ना अतिशय योग्य असे मार्गदर्शन करू शकतो.